देशभरातील अश्वशौकीन ज्या यात्रेची आवर्जून वाट पहात असतात त्या सारंगखेड्याच्या यात्रेला सुरुवात झालीय. त्यात चेतक फेस्टिव्हल नावानं अश्व महोत्सव आता भव्य स्वरुपात आयोजित करण्यात आलाय. राज्य पर्यटन विकास महामंडळाचंही त्याला पाठबळ लाभलंय. जातिवंत अशांसाठी ही यात्रा हा बाजार प्रसिद्ध आहे. कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून, प्रशासनाने या घोडेबाजाराला परवानगी दिली आहे.